सावंतवाडी : आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी तिरोडा येथील मतदान केंद्रावर माजी राज्य मंत्री प्रवीण भोंसले यांनी पत्नी सौ. अनुराधा भोंसले व कुटुंबीयांसह आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच सर्व मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे मतदान करावे असेही आवाहन माजी राज्यमंत्री श्री. भोंसले यांनी केले.



