धुळे : निसर्गपुजक ,जल – जंगल – जमिनीशी तादात्म पावलेल्या आदिवासी बांधवांचे लोकजीवन व निसर्गसंवर्धन करणारी आदिवासी संस्कृती समजून घेण्यासाठी युवांनी आदिवासी भागातील लोकांशी संंवाद साधावा. हा उद्देश समोर ठेवत सातपुड्यात नर्मदा नदीच्या निसर्गरम्य परीसरात युवा संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत परीसरातील दुर्गम भागात कार्यरत ,यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील युवांसाठी सहावे ‘ युवा संवाद शिबीर’ दि. 27 फेब्रुवारी ते 3 मार्च 2026 दरम्यान ,सातपुड्याच्या दुर्गम उडद्या पाड्यांत (ता. धडगाव, जि. नंदुरबार) आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे –
– वयोमर्यादा – 19 ते 40 वर्षे
– शिबीर शुल्क – 2000/- (ऐच्छीक)
शिबिरात फक्त 30 युवक युवतींसाठी प्रवेश मर्यादित.
नाव नोंदणीची अंतिम मुदत – 25 फेब्रुवारी 2026
ठिकाण – उडद्या पाडा ( सातपुडा – नर्मदा नदी परीसर ) ता. धडगाव, जि. नंदुरबार.
सामाजिक कामाची आवड असलेल्या व आदिवासी संस्कृती समजून घेण्यास ईच्छुक युवांना प्राधान्य .
– शिबिराचे वैशिष्ट्ये –
• सातपुडा पर्वतरांगेत नर्मदा नदीच्या निसर्गरम्य परीसरात शिबिराचे आयोजन.
• सातपुड्यातील आदिवासीं बांधवांसोबत थेट संवाद.
• वीज ,रस्ते, मोबाईल नेटवर्क नसलेल्या दुर्गम पाड्यांवर भेटी.
• डोंगर दरीत व नर्मदा नदीच्या परिसरात भटकंती
• स्वभानाबरोबर समाजभानाची जाणिव निर्माण व्हावी यासाठी गटचर्चा.
• आदिवासी भागातील सर्वात मोठा, होळी उत्सव अनुभवण्याची संधी.
• भोजन व निवासाची व्यवस्था संस्थेकडून येईल
• शिबिरार्थिंनी स्वखर्चाने प्रवास करून शिबिरस्थळी पोहचावे.
• डोंगर दरी असलेल्या दुर्गम भागात व पुरेशा सोई सुविधा नसलेल्या ठिकाणी थांबण्याची तयारी असावी.
– शिबिराविषयी अधिक माहीती व नाव नोंदणीसाठी – 7588001508,9552135860,9823235945



