‘हा’ तर तमाम महिला वर्गाचा अवमान!, ‘त्यांचे’ असे वागणे संस्कृतीला शोभनिय नाही!, सावंतवाडीच्या विकासासाठी मोठं मन ठेवावं! : सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले.

सावंतवाडी  : आज नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मी या सभेला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्या संदर्भात मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे कळविले होते. मी जेव्हा महिन्याभरापूर्वी माझ्या प्रेग्नेंसीच्या रजेवर गेले तेव्हाच मी सावंतवाडीच्या नागरिकांना वचन दिले होते की या शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी मी जरी रजेवर गेले असले तरी मी शहराच्या विकासाच्या दृष्टीने ॲक्टिव्ह राहून काम करणार आहे. मी ऑनलाईन बैठक अथवा कामकाजाची माहिती घेत राहणार आहे असे सूचित केले होते. आज सकाळी 11 वाजता बैठक सुरू झाली तेव्हा मी मुंबईहून ऑनलाइन झूमवर बैठकीला उपस्थित होते जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा काही नगरसेवकांनी माझ्या मिटींग मधील ऑनलाइन सहभागाला विरोध केला. माझ्या माहितीप्रमाणे रजेवर असणाऱ्या नगराध्यक्षांना ऑनलाइन मीटिंगमध्ये सज्हभाग घेता येत नाही, असा कोणताही नियम अस्तित्वात नाही. मी लोकनियुक्त नगराध्यक्षा असून सावंतवाडी शहराच्या प्रगती बाबतीत माहिती घेणे हे माझे कर्तव्य आहे. खरं तर सावंतवाडी शहराच्या संस्कृतीच्या आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने एखाद्या नगराध्यक्षाला असे मिटींगमध्ये पासून ठेवणे दूर ठेवणे हे संस्कृतीला शोभनिय नाही. आपला भारत देश स्त्रीचा सन्मान राखणारा देश आहे. आजचे युग हे एआयचे युग झाले आहे, आपला सिंधुदुर्ग जिल्हा ही प्रगत होत आहे. असे असताना या प्रगत जिल्ह्याच्या सावंतवाडी सारख्या पर्यटन शहराच्या प्रथम नागरिक म्हणून मला जनतेने निवडून दिले. मी तेव्हा जनतेला अभिवचन दिले होते मी कुठल्याही आजारपणाच्या रजेसाठी गेलेले नाही तर एका मुलाला मी जन्म दिला आहे आणि यासाठीच मी सध्या रजेवर आहे. असे असताना मला ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित राहण्यास विरोध करणे एका महिलेला अशी वागणूक देणे हे खरंतर अयोग्य आहे. कोरोना महामारीपासून ऑनलाईन सिस्टीम सुरू झाली आहे. अनेक मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी हे ऑनलाईन बैठकीना व उपक्रमांना हजेरी लावतात त्यात गैर असे काही नाही मग सावंतवाडीसारख्या सुसंस्कृत शहरात असे कृत्य करणे म्हणजे सावंतवाडी शहरातील नागरिकांचा तो अपमान आहे. खरंतर महिला वर्गाचा ही अपमान आहे. मला अधिक काही बोलायचे नाही परंतु मला ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्यापासून वंचित ठेवले आणि त्याबाबत पत्रकारांशी वार्तालाप केला त्यामुळेच मला माझी भूमिका मांडावी लागली. मी सावंतवाडीच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने विकासात्मक काम करण्याचे ठरवले आहे. मी लवकरच सावंतवाडीत येणार आहे. सावंतवाडीच्या जनतेला मुबलक पाणी, स्वच्छ सावंतवाडी सुंदर सावंतवाडी, आणि पर्यटन विकास तसेच आरोग्य रोजगाराभिमुख प्रकल्प क्रीडा उपक्रम, युवक व महिलांच्या हातांना काम, एक आदर्श व पर्यटन शहर म्हणून या शहराला संपूर्ण जगभरात एक वेगळी ओळख कशी प्राप्त करून देता येईल यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. केंद्र व राज्यातील महायुतीच्या सत्तेमुळे विकासात्मक कामे आपल्याला वेगाने प्रगतीपथावर न्यायची आहेत. आपल्याला एकमेकांविरोधात उभे राहून या शहराला विकासापासून दूर ठेवायचे नाही. त्यामुळे ज्यांनी हे काही केले त्यांना मला एवढेच सांगायचे आहे की सावंतवाडी शहराचा विकास होत असताना अशी संकुचित मनोवृत्ती असता कामा नये असे मला वाटते. सावंतवाडीची जनता शांत, सुसंस्कृत आणि सुज्ञ आहे ती बरोबर ओळखून आहे त्यामुळे मी एवढेच सांगू इच्छिते आपण सर्वांनी एक होऊन काम करूया. जनतेच्या हितासाठी आपण कामात राहणे आणि वचन पूर्ती करणे हेच महत्त्वाचे आहे असे मला सांगावेसे वाटते, असे सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले यांनी कळविले आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles