रेडी येथे १६ मार्चला मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन.

वेंगुर्ला :  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी (शिवप्रेमी यशवंतगड) यांच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच माऊली युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून १६ मार्च रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट, मुंबई, माऊली युवा प्रतिष्ठान रेडी व दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिबिराचे स्थळ स्थळ ग्रामपंचायत रेडी सभागृह (व्यासपीठ) असून  दिनांक: सोमवार, १६ मार्च २०२६ सकाळी १० ते सायंकाळी ४ या कालावधीत हे शिबिर संपन्न होणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून केवळ ₹१८० मध्ये चांगल्या दर्जाचे चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच सध्याच्या काळात विविध शस्त्रक्रिया व उपचारांसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून एखाद्याचे प्राण वाचविण्याच्या या पुण्यकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा व रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माऊली युवा प्रतिष्ठान व दुर्गरक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles