उपक्रमशील शिक्षक रूपेश परब यांचे शैक्षणिक व्हिडीओनिर्मिती स्पर्धेत सुयश.!

सावंतवाडी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र राज्य मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये जि.प. पू प्रा. केंद्रशाळा इन्सुली नं 4 शाळेचे पदवीधर शिक्षक तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडी तालुक्याचे सचिव रूपेश दत्ताराम परब यांनी तालुका व जिल्हा स्तरावर सुयश प्राप्त केले आहे.


सदर स्पर्धेमध्ये रुपेश परब सावंतवाडी तालुकास्तरावर 1 ली ते 2 री भाषा, 1ली ते 2 री गणित,1ली ते 2 री इंग्रजी, 3री ते 5वी भाषा, 6 वी ते 8 वी इंग्रजी, 9 वी ते 10 वी भाषा, 9 वी ते 10 वी विज्ञान, 9 वी ते 10 वी सामाजिक शास्त्र अशा एकूण 8 गटात *प्रथम क्रमांक*, 9 वी ते 10 वी गणित, 9 वी ते 10 वी इंग्रजी, 9 वी ते 10 वी विज्ञान, 9 वी ते 10 वी सामाजिक शास्त्र अशा ४ गटात *द्वितीय क्रमांक*,आणि 9 वी ते 10 वी गणित *तृतीय क्रमांक* असे तालुकास्तरावर वेगवेगळ्या गटात १३ क्रमांक प्राप्त केले आहेत तसेच जिल्हास्तरावर 9 वी ते 10 वी भाषा, 9 वी ते 10 वी इंग्रजी, 11 वी ते 12 वी भाषा, 11 वी ते 12 वी इंग्रजी या चार गटात द्वितीय तर 11 वी ते 12 वी गणित मध्ये तृतीय असे जिल्हास्तरावर वेगवेगळ्या गटात पाच क्रमांक प्राप्त केले आहेत.

अशाप्रकारे सर्वच गटात आपले वर्चस्व सिद्ध केल्यामुळे शिक्षकामधून त्यांचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस म. ल. देसाई, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी  श्रीमती कल्पना बोडके यांच्याकडून व संघटनेच्या सर्व सदस्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles