मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची गांधर्व महाविद्यालयाच्या विविध परीक्षांमध्ये प्रशंसनीय कामगिरी!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई मार्फत आयोजित विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. विविध वाद्य वादन परीक्षामध्ये तबला या वाद्य प्रकारात कु. स्मीत सावंत याने विशेष योग्यता प्राप्त केली तर कु. अदवैत मुंगी व कु. तनीष गावडे यांनी प्रथम श्रेणी व कु. रुद्र सावंत याने द्वितीय श्रेणी मिळवली. पखावज या वाद्य प्रकारात कु. विस्मय तेली याने प्रथम श्रेणी संपादीत केली. तसेच हार्मोनियम या वाद्य प्रकारात कु. सुभाष गवस याने प्रथम श्रेणी प्राप्त केली. गायन या प्रकारात प्रवेशिका पुर्ण परिक्षेत कु. चिन्मयी वाळके हिने प्रथम श्रेणी तर नेहा वेरेकर हिने द्वितीय श्रेणी प्राप्त केली.भरतनाट्यम या नृत्य परीक्षेत कु. प्रचिती गिरप, कु. श्रेया मोर्ये, कु. काव्या मांजरेकर यांनी प्रथम श्रेणी मिळवली तर कथ्थक या नृत्य परीक्षेत कु. दृष्टी मुंड्ये आणि प्रवेशिका प्रथम परिक्षेत ब्रांम्ही निवेलकर हिने विशेष योग्यता प्राप्त केली. तर कु. आरोही भाग्यवंत, कु. स्वरा धुरी, कु. लावण्या केसरकर व कु. वैष्णवी बोडके यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली तसेच कु. आहिशा कांडारकर हीने द्वितीय श्रेणी मिळवली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles