ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याची जोरदार चर्चा. ; खासदार ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया काय?

धाराशिव : शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटणार असल्याची माहिती आहे. हे सर्व खासदार दिल्लीत आहेत. काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. हे खासदार वेगळा गट निर्माण करणार आहेत. तसे पत्र दिले जाईल. एकनाथ शिंदे यांनी या 6 खासदारांना काही आश्वासन दिल्याचे कळतंय. 6 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागली असून एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. यादरम्यान संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्याकडून दिल्लीत पत्रकार परिषद घेतली जाईल. 6 खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याकरिता शिवसेना शिंदे गटाकडून मेलच्या माध्यमातून व्हिप जारी करण्यात आले. मतदार संघात जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या खासदारांना दिल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल होणाऱ्या खासदारांची नावेही पुढे आलीत. त्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे. ओमराजे निंबाळकर दिल्लीत असल्याची माहिती मिळतंय. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाला सोडून थेट शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. बंडखोरीदरम्यानच आता ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटासोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. यादरम्यानच ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याची चर्चा आहे.

बंडखोरीच्या चर्चेदरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी पोस्ट शेअर केली. त्यांनी ही पोस्ट राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केली. ओमराजे निंबाळकर यांच्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले की, ”स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ..! युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले, वाढले आणि त्यांचे ‘निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।’ असे वर्णन होऊ लागले ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची!, लोककल्याणकारी अशा स्वराज्याच्या निर्मितीचे ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रूजवण्याचे कार्य जिजाऊंनी केले. कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता, धैर्य, नीतीमूल्ये आणि वीरतेचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. त्या एक आदर्श माता होत्या. त्यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ..!”

आता ओमराजे निंबाळकर यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles