“जिथे अन्याय, तिथे सुशिल!” – लढवैय्या युवा माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख.

✍️ रूपेश पाटील. 
माहिती अधिकाराच्या शस्त्राने जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या लढवैय्या युवा माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल रूपाजी चौगुले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
“उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!,” हा स्वामी विवेकानंदांचा संदेश आपल्या कृतीतून साकार करणाऱ्या, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणाऱ्या आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या सुशिल रूपाजी चौगुले यांचा आज वाढदिवस.

स्वामी विवेकानंद यांच्या मते युवक म्हणजे केवळ वयाने तरुण व्यक्ती नव्हे, तर ज्याच्यात आत्मविश्वास, धैर्य, राष्ट्रभक्ती, चारित्र्य आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे तोच खरा युवक. या विचारांचे जिवंत उदाहरण म्हणजे सुशिल चौगुले. आपल्या कार्यक्षमतेवर प्रचंड विश्वास आणि समाजहिताची तळमळ मनात बाळगून त्यांनी समाजकारणाची एक वेगळी वाट निवडली आहे.
माहिती अधिकार पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक अन्यायग्रस्त, पीडित आणि दुर्लक्षित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशाला दिलेल्या माहिती अधिकाराच्या प्रभावी शस्त्राचा वापर करून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. शासन आणि प्रशासनातील त्रुटी, दुर्लक्ष किंवा चुकीच्या पद्धतींना वाचा फोडून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.


सुशिल चौगुले यांची लेखणी ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती समाजहितासाठी लढणारी एक प्रभावी ताकद आहे. समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटना, जनतेच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष आणि अन्यायाच्या विरोधात त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे शासन आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय निर्माण होण्यासही मदत होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
“जिथे अन्याय, तिथे सुशिल” ही ओळख आज जनमानसात निर्माण झाली आहे. त्यांच्या निर्भीड स्वभावामुळे, तर्कशुद्ध मांडणीमुळे आणि सखोल अभ्यासामुळे अनेक अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणांनाही त्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी लागते. सत्यासाठी लढण्याची त्यांची वृत्ती आणि समाजहितासाठी झटण्याची तळमळ हीच त्यांची खरी ताकद आहे.
सजग, सर्जनशील, अभ्यासू आणि समाजक्रांतीची मशाल हाती घेऊन वाटचाल करणाऱ्या या आदर्श युवा व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, हीच सदिच्छा.!

“अन्यायाविरुद्ध लेखणीची तलवार बनून लढणाऱ्या, माहिती अधिकाराच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या, समाजहितासाठी सदैव तत्पर असलेल्या माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल रूपाजी चौगुले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles