गरिबाच्या घरावर वादळाचा घाला, संकटात मदतीला ‘संजूच’ धावला! ; सांगेलीतील नुकसानग्रस्त विष्णू राऊळ कुटुंबाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा मदतीचा हात! 

✍️ रूपेश पाटील
सावंतवाडी : सांगेली येथील टेमकरवाडीमध्ये अलीकडेच झालेल्या जोरदार वादळात विष्णू राऊळ यांच्या घरावर मोठे फणसाचे झाड कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संजू परब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेतली.
घराची पाहणी करून त्यांनी विष्णू राऊळ व त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत तत्काळ आर्थिक मदतीचा हात पुढे केला. संकटाच्या क्षणी दिलासा देणारा हा मदतीचा हात पाहून कुटुंबीयांनीही समाधान व्यक्त केले.


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, बाबुराव कविटकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, रमाकांत राऊळ तसेच दीपक सांगेलकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजू परब यांनी, “नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तसेच इतर आवश्यक सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू. संकटाच्या या काळात शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” अशी ग्वाही दिली.
संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी पोहोचून मदतीचा हात पुढे केल्याने परिसरातील नागरिकांकडून या संवेदनशील भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles