Great.!- शांतिनिकेतनच्या छोट्या कबीरचा बडा धमाका.! ; महात्मा गांधी देश सेवा पुरस्काराने झाला सन्मानित!

सावंतवाडी :  येथील शांतिनिकेतन स्कूलचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कु. कबीर हेरेकर याला बेंगळुरू येथील वेयील फाऊंडेशन ( Veyil Foundation) या संस्थेने महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी देश सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

आज सगळे जग हे मोबाईलच्या विळख्यात सापडले असून भावी पिढी ही मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करत चालली आहे व दिवसभर मोबाईल गेम व रिल्स यात अडकून स्वतःला शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक दृष्ट्या कमकुवत बनवत चालली आहे. यातच कबीर हा समाजासमोर एक वेगळे उदाहरण घेऊन अगदी लहान वयातच अनेकांसाठी प्रेरणा बनत आहे.

केवळ 8 वर्षाच्या कबीरने महाराष्ट्र व गोवा राज्यात झालेल्या १५ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. बिये गोळा करून त्यांची लागवड जंगलात करणे. टाकाऊ पासून टिकाऊ कुंड्या तयार करणे, घरामध्ये वापरात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांपासून इको ब्रिक्स बनवणे, प्राणी रक्षणासाठी धडपडत असणे हे कबीरचे वैशिष्ट्य आहे. एवढे सगळे करत असताना देखील सायकलिंग, स्वीमिंग, स्केटिंग अश्या खेळांमध्ये देखील कबीर सहभाग घेत असतो. याच कार्यांची दखल घेत या संस्थेने कबीरला गौरवीले आहे. कबीर पासून प्रेरणा घेऊन इतर मुले देखील मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडतील व मैदानी खेळाकडे वळतील अशी अपेक्षा या संस्थेने केली आहे.
कबीरला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करताना शाळेतील शिक्षकवर्ग श्री. नंदीहळी सर, वारंग सर, कुडतरकर सर, सावळे सर, गोरेटी मॅडम, अमीता मॅडम, गौरी डिचोलकर मॅडम व संगीता मॅडम उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles