गारपिटीचे मोठे संकट, ताशी ७० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे! ; ‘१०’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा इशारा!

मुंबई : राज्यात पाऊस कमी अधिक होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज होता. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. राजस्थानच्या अनुपगढपासून दिल्ली, सिंधी ते पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.

छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, गोदिंया, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. देशभरात पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

यासोबतच काही भागात 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते अन् जोरदार पाऊसही असेल. मात्र, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही राज्यांत गारपिटीचीही शक्यता आहे. जोरदार वाऱ्यांमुळे मोठी झाडे पडू शकतात. गारपिटीचा इशारा देण्यात आला. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पाऊस चांगलाच कोसळताना दिसत आहे. त्याच आजही मोठा इशारा देण्यात आला.

https://youtube.com/shorts/TNIoEyQuiqg

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles