सावंतवाडी : सावंतवाडीचे नायब तहसीलदार श्री. मनोज मुसळे यांच्या आकस्मिक निधनाची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.
अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, मनमिळावू आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून मनोज मुसळे यांनी आपल्या कार्यातून आणि वागण्यातून अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. पद कितीही मोठे असो, माणुसकी जपणारा स्वभाव हीच त्यांची खरी ओळख होती.
इतक्या अचानकपणे त्यांचा निरोप घ्यावा लागेल, यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर, सहकाऱ्यांवर आणि त्यांना जवळून ओळखणाऱ्या प्रत्येकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची कार्यतत्परता, साधेपणा आणि आपुलकीचा स्वभाव सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो.
स्व. मनोज मुसळे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🕯️🙏
ॐ शांती.
– विशाल परब.
युवा नेते, भारतीय जनता पार्टी,
महाराष्ट्र राज्य.



