वेंगुर्ले : तालुक्यातील खानोली गावचे सुपुत्र तथा दशावताराचे गाढे अभ्यासक प्रा. वैभव खानोलकर यांच्या ‘एक समृद्ध लोककला दशावतार’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. ९ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजता वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित केला आहे. लोककला संशोधक डॉ. अशोक भाईडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, शिक्षक भारती महाराष्ट्रचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, प्रहारचे संपादक संतोष वायंगणकर, सकाळचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख शिवप्रसाद देसाई आणि दशावतार ज्येष्ठ कलावंत यशवंत तेंडोलकर आदी उपस्थित राहणार आहेत.
प्रा. वैभव खानोलकर लिखित ‘एक समृद्ध लोककला – दशावतार’चे ९ रोजी प्रकाशन.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


