मुंबई : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल अनुप मोरे यांची प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भेट घेत पुष्पगुच्छ दिला आणि नियुक्ती बद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, निखिल चव्हाण, बादल कुलकर्णी, योगेश मेद, सुदर्शन पाटसकर, रुपेश सावरकर आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
आज नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ठाणे-कोकण विभागाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. विक्रांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत सर्व प्रदेश पदाधिकारी, सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस तसेच मंडल अध्यक्ष उपस्थित होते. युवा मोर्चाच्या पुढील संघटनात्मक वाटचालीबद्दल आणि आगामी कार्यक्रमांबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली असल्याचे समजते. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने युवा मोर्चा ॲक्शन मोडमध्ये उतरल्याचे दिसून येत आहे.