आर्य चाणक्य हे एक थोर विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक विषयांवर चर्चा केली, जे विषय आज देखील जीवन जगताना अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आदर्श पती कसा असावा, आदर्श पतीची लक्षण काय आहेत? आदर्श पत्नी कशी असावी, आदर्श पत्नीची लक्ष काय आहेत? राजाचे आपल्या प्रजेसोबत संबंध कसे असावेत? प्रजेनं राजासोबत कसं वागावं? आदर्श राज्यकारभार कसा असावा. जीवनात कोणत्या गोष्टी करू नयेत? कोणत्या गोष्टी कराव्यात. शत्रू कसा ओळखावा? आपला खरा मित्र कोण? अशा एकना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे.
या लोकांवर विश्वास ठेवू नका –
आर्य चाणक्य म्हणतात की, असे लोक जे तुमच्या तोंडावर तुमचं कौतुक करतात. मात्र तुमच्या पाठिमागे तुमची निंदा करतात, अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तुमची पत्नी जर तुम्हाला धोका देत असेल तर तिच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका असंही आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. तुमचा खूप जवळचा मित्र असेल, तुमचा त्याच्यावर खूप विश्वास आहे, मात्र त्याने जर तुमचा विश्वासघात केला तर अशा मित्रावर तुम्ही परत कधीच विश्वास ठेवू नका, कारण तुम्हाला पुन्हा देखील धोकाच भेटू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींपासून तुम्ही स्वत:ला दूर ठेवा त्यातच तुमचं भलं आहे, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(विशेष सूचना : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाहीत.)