सावंतवाडी : हिंदू एकता मंच यांच्या वतीने शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक श्री. संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते बजरंग दल, गोरक्षक सावंतवाडी टीमचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारत माता, गोमाता, दुर्गा माता, जन्मजाती माता यांचे संरक्षण करणारा ‘हिंदू’ असे भिडे गुरुजींनी सांगितले. हिंदू एकता मंचच्या या उपक्रमाबद्दल बजरंग दल, गोरक्षक सावंतवाडी टीमने आभार मानले.