….अन् कार अचानक पेटली ! ; ५ जण थोडक्यात बचावले.

  • उरणमधील कुट्टी परिवारातील सदस्य मृत्यूच्या दाढेतून बाहेर.
  • कारमध्ये अचानक आग लागताच सर्वांनी कारबाहेर मारल्या उड्या.
  • रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण येथून केरळच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने रस्त्यात अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकासह सर्वजण वेळीच उतरल्याने बचावले आहेत. ही कार उरण, रत्नागिरी, गोवा असा प्रवास करून पुढे गेली असता केरळ राज्यात कासारगोड जिल्ह्यात घडली.
    उरण तालुक्यातील बोरी पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे इकबाल अहेमद कुट्टी, रुबीना इकबाल कुट्टी (पत्नी ), नोफ एकबाल कुट्टी (मुलगी ), अजीझा इकबाल कुट्टी (मुलगी ), उमर इकबाल कुट्टी (मुलगा ) हे सर्वजण एका कुटुंबातील सदस्य अशांनी २१ मे रोजी रात्री केरळच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यांनी रत्नागिरी, गोवा, मंगलोर असा प्रवास केला होता. शुक्रवार दिनांक २३ मे २०२५ रोजी मारुती एर्टिगा MH 46 CV 6557 या कारने हे सर्वजण प्रवास करत असताना कासरगोड चरकाला या ठिकाणी सकाळी ५:३० वाजता कारमधून अचानक धूर येऊ लागला.
    यावेळी रुबीना इकबाल कुट्टी या कार चालवत होत्या.धूर येऊ लागल्याने रुबीना इकबाल कुट्टी यांनी कार अचानक बाजूला पार्किंग केली.
    कारमधून अचानक सर्वजण बाहेर पडले. सुरक्षित ठिकाणी एका बाजूला सर्वजण उभे राहिले. यामुळे सर्वांचे प्राण वाचले.
    या घटनेत कारला आग लागून कारचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गाडीला आग लागल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे या घटने बाबत इकबाल अहेमद कुट्टी व त्यांच्या परिवाराने कासारगोड जिल्ह्यातील विद्यानगर येथील पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने कलम ३०६(१)(C)(FA )अंतर्गत FIR नोंदवून घेतला आहे. दरम्यान, वाहनाला आग लागल्याची घटना कशामुळे घडली ? आग कशी लागली याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles