आ. दीपक केसरकरांनी केले नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचे अभिनंदन! ; सावंतवाडीच्या विकासासाठी योग्य ते सहकार्य करण्याची दिली ग्वाही.

सावंतवाडी : राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी केसरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया आणि सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवूया, असा विश्वास आमदार केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची भेट घेऊन त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवराज लखमराजे भोंसले उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles