जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे विधायक कार्य करा! : आ. दीपक केसरकर. ; शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांच्या सत्कार समारंभात दिल्या महत्त्वाच्या टिप्स!

सावंतवाडी : आपापल्या प्रभागातील जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सभागृहात जनतेचे हित लक्षात घेऊन अभ्यासपूर्ण मांडणी करा. जनतेच्या विकासासाठी स्वतःला झोकून देऊन काम कर. फार मोठ्या विश्वासाने जनता आपल्याला निवडून देते. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असं विधायक कार्य करा!, असे मौलिक सल्ले राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिलेत.

सावंतवाडी येथील श्रीधर अपार्टमेंटमध्ये आयोजित शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभ वेळी आ. केसरकर बोलत होते. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, शहरप्रमुख तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे, नगरसेविका अॅड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर यांचा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता सावंत, संजय पेडणेकर, दिपाली सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles