सावंतवाडी: रंगतदार चवीची खात्री देणाऱ्या दर्जेदार कॅफेची सुविधा सावंतवाडी शहरात उपलब्ध होत आहे. शहराच्या मध्यभागी मोती तलावानजीक आज “बेक्स अँड ब्रुझ” या कॅफेचे उद्घाटन आणि शुभारंभ सौ. वेदिका परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे. यावेळी भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशाल परब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी श्री रंगनाथ गवस, केतन आजगावकर, धीरेंद्र म्हापसेकर, शिरीष नाईक सचिन शेटये, नगरसेविका मोहिनी मडगावकर, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, मेघा डुबळे आदि नगरसेविका शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. सावंतवाडीकरांच्या सेवेत अशा प्रकारचे दर्जेदार कॅफे रेस्टॉरंट रुजू झाल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.



