अफाट जिद्दीचे दीपस्तंभ : सतीश नाना पाटील (Chief Judicial Magistrate, Latur) – वाढदिवस विशेष.
वाचक मित्रहो,
“मातीचा सुगंध अंगी बाणलेला, कष्टांची शिदोरी खांद्यावर घेऊन जीवनप्रवास सुरू करणारा एक सामान्य कुटुंबात जन्मास येऊन असामान्य कर्तृत्व निर्माण करणारे पुण्यभूमी नगाव गावाचे गुणवंत सुपुत्र, आणि आज त्याच आपल्या नगावच्या ह्या लेकराने आपल्या जिद्दीच्या बळावर गाठलेले उंच शिखर “मुख्य न्यायिक दंडाधिकारी, लातूर” ( Chief Judicial Magistrate, Latur) हे अत्यंत मानाचे पद! – आदरणीय दादासाहेब सतीश नाना पाटील यांचा हा प्रवास म्हणजे केवळ यशोगाथा नाही, तर संघर्ष, चिकाटी आणि स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.

पुण्यभूमी नगावच्या अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेले सन्माननीय सतीशदादा यांचे बालपण अभावांनी वेढलेले होते. परिस्थिती कधीच त्यांच्या बाजूने नव्हती, पण त्यांनी परिस्थितीला कधीच आपल्या पावलांवर मात करू दिली नाही. शिक्षणाच्या वाटेवर चालताना आलेल्या असंख्य अडचणी, आर्थिक ताण, संसाधनांची कमतरता, आणि समाजातील विविध अडथळे यांवर त्यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर मात केली. प्रत्येक अडचण त्यांच्यासाठी अडथळा नव्हती, तर ती होती पुढे जाण्याची नवी प्रेरणा.
आमच्या नगाव गावातील पहिले न्यायाधीश म्हणून मिळवलेला मान हा केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला. त्यांच्या यशाने गावाच्या मातीत नवी आशा पेरली, स्वप्नांना नवी दिशा दिली.
याच प्रेरणेतून आज पुण्यभूमी नगावातील अनेक युवक सतीश दादांच्या पावलांवर पाऊल ठेवत स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आपले करिअर घडवत आहेत. त्यांच्या संघर्षकथेतून प्रेरणा घेत, अनेक तरुणांनी स्वप्नांना नवी झेप दिली आहे. त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच वाखाणण्याजोगे असून, ते आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरले आहे.
आज ते न्यायव्यवस्थेतील उच्च पदावर कार्यरत असले तरी त्यांच्या स्वभावातील साधेपणा आणि माणुसकी अजूनही तितकीच जिवंत आहे. मोठेपणाच्या उंचीवर पोहोचूनही जमिनीवर पाय घट्ट रोवून ठेवणारे ते खरे व्यक्तिमत्त्व आहेत. गरजूंना मदतीचा हात देणे, समाजासाठी सदैव तत्पर राहणे, अडवलेल्या घडलेल्या लोकांची मनोभावे सेवा करणे आणि नेहमी इतरांच्या सुखात आपले सुख पाहणे हीच त्यांची खरी ओळख आहे. माणुसकी जपणारं हे जिंदादिल, हसतमुख, विनम्र अन् मितभाषी व्यक्तिमत्व अगदी सहज कुणालाही आपले हक्काचे वाटतात, हा दादांच्या स्वभाव गुणातील सर्वात मोठा पैलू म्हणावा लागेल.
आज या पुण्यभूमीच्या लेकराचा वाढदिवस… या निमित्ताने त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी, आपली कुलस्वामिनी श्री आई भटाई देवी, महाराष्ट्राचीवकुलस्वामिनी आई जगदंबा यांच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!
दादा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो, यशाच्या शिखरावर तुमची पताका अधिकाधिक उंच फडकत राहो, आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती तुम्हाला लाभो!, हीच मनापासून इच्छा.
तुमचा प्रवास असाच प्रेरणादायी राहो, तुमचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक ठरो, आणि तुमच्या यशकथेतून अनेकांना नवी दिशा मिळत राहो, यासाठी हृदयपूर्वक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हृदयाच्या कप्प्या कप्प्यातून लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा, आदरणीय सतीश दादा!, आप जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार..!
दादासाहेब आज आपल्या वाढदिवसानिमित्त आमच्या तळकोकणातील खास खणखणीत बारा पाचाचे मालवणी गाऱ्हाणे-
“बा देवा महाराजा… होय महाराजा…!, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, पंढरपूरच्या विठूराया, गाणगापूरचा श्री गुरुदेव दत्त, आंगणेवाडीची भराडी देवी, सोनुर्लीची माऊली, सावंतवाडीचा पाटेकर, ३६५ खेड्यांचा चाळा उपरलकर, श्री देवी सातेरी – भावई – काळकाई, श्री देव रवळनाथ, कलया – मलया, आई देवी भवानी, श्री देव वेतोबा, भूतनाथ, म्हातारोबाबा, स्थापेश्वर, शिर्डी निवासी साई बाबा, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ, शेगाव निवासी श्री गजानन महाराज, काड सिध्देश्वर महाराज, गगनगिरी महाराज, स्वरुपानंद स्वामी, फलहारी महाराज, सद्गुरू साटम महाराज, संत राऊळ महाराज, संत भालचंद्र महाराज, आई दिर्बा देवी, देवा रामेश्वरा … *आज आमुचो लाडको पुण्यभूमी नगाव गावाचचो सुपुत्र, प्रिय सतीश दादा ह्यांचो वाढदिवस तुमचो आर्शिवादान होता….. तुझ्या प्रत्येक लेकराची कुलदेवता, गावदेवता स्थलदेवता, त्यांच्या घराण्याचो कुळपुरूष, मुळपुरूष, वस निरवंशी, पितरगत, सवासिन, आकवारीन त्यांच्या दया रखवालीक सामील करून दी.. त्यांच्या मागे असलेली करना, करतूद, मय मानतूक, बारा भानगडी अठरा नडी, कोणाची पंचाक्षरी करनी, वेताळ साधनूक, गारूडी विद्या, मुसलमानी करनी… कोणी सिमेतून, सिमेबाहेरसून, आणून सोडली आसात तर ज्याचा खोटा त्याच्या पदरात घालून तुझ्या या लेकराचा, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, संरक्षण कर.. जारन, तारन, मारन, संमोहन, वशिकरन, भूत, पिशाच्च, बाधा यांपासून संरक्षण कर, होय महाराजा..!, लेकरा ज्या ठिकाणी हात घालतीत थय सोना निर्माण कर, शब्द टाकतीत थय शब्द रूजा होया, फुला होया असा सकृतत्व जोडून दी…. लेकरांकडे काय आरोग्याच्या तक्रारी असतील, वात-पित्त-कफ विकार आणि बाहेरचा काय खाल्यामुळे तयार होणारे आजार असतील तर सगळ्या आजाराचा वारा पाणी कर.., होय महाराजा..! अगदी पायाच्या अंगठ्याच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत शरीर पंचमहाभुतांनी बनलंय…. त्या शरीराची काया-माया सांभाळून , अखंड निरोगी दिर्घआयुष्य दी, त्यांच्या हाता पायाकडे राखण रखवाली धरून संरक्षण कर, काय ग्रहमानाची वक्रदृष्टी आसात तर सगळे ग्रहमान अनुकूल करून त्यांचा चांगला फळ लेकरांका मिळा होया… असा सकृतत्व जोडून दी… लेकरा रात्री बेरात्री आपल्या वाहनान फिरतत, त्या वाहनाचा सारथ्य तू करून तो प्रवास निर्विघ्न पार पडा होया… असा सकृतत्व जोडून दी…, होय महाराजा…..!, तुझं लेकरु ज्या ज्या क्षेत्रात आसात त्या त्या क्षेत्रात त्यांका यश मिळवून दी रे महाराजा…. होय महाराजा..!!! जय महाराजा..! जय आई भटाई देवी..!
💥आपला हितचिंतक स्नेही.💥
✍️ रुपेश पाटील ✍️
(नगावकर),
ह. मु. – सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग



