सावंतवाडीत उद्या दहावी-बारावी गुणवंतांचा भव्य सन्मान सोहळा. ; शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित तसेच आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सन्मान सोहळा.

सावंतवाडी : शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित तसेच आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता सावंतवाडी शहरातील काझी शहाबुद्धीन हॉल (एस.टी. स्टँडसमोर) येथे करण्यात आले आहे.

या सोहळ्यात तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असून, त्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.

या प्रेरणादायी सन्मान सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. संजू परब यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles