सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्यावतीने उद्या श्री सत्यनारायण महापूजा व ६४ वी वार्षिक सभेचे आयोजन. ; सभासद, हितचिंतक व नागरिकांना उपस्थितीचे आवाहन.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ सावंतवाडी (माठेवाडा) यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा तसेच ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार असून, त्यानंतर सकाळी ११ वाजता संघाची ६४वी वार्षिक सभा होणार आहे. दोन्ही कार्यक्रम सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या माठेवाडा येथील ठिकाणी पार पडणार आहेत.

महापूजेच्या निमित्ताने उपस्थित सभासद, हितचिंतक आणि नागरिकांना श्री सत्यनारायण महाप्रसाद व भोजनाचा लाभ घेता येणार आहे. यानिमित्ताने धार्मिक वातावरणासोबतच संघाच्या वार्षिक कामकाजाचा आढावाही घेण्यात येणार आहे.

संघाच्या वतीने सर्व सभासद, हितचिंतक तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्री सत्यनारायण महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि वार्षिक सभेस उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

‘आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी आनंदाची पर्वणी!’ या भावनेतून सर्वांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles