भाजपाच्या ‘सेवा अभियानाला’ सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद! ; ३७० निवेदनांतून जनतेच्या प्रश्नांना वाचा. ; प्रशासकीय पाठपुराव्याला मिळणार गती : आमदार प्रमोद जठार.

सावंतवाडी : सत्ता म्हणजे केवळ निर्णय घेण्याची ताकद नव्हे, तर सामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी! याच भूमिकेतून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा अभियानाला’ सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी आयोजित या अभियानात तब्बल ३७० निवेदने प्राप्त झाली.

“भाजपा संघटनेला प्रशासकीय बळ देत नागरिकांच्या प्रश्नांना केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष पाठपुराव्याची जोड देणे, हा ‘सेवा अभियानाचा’ मुख्य उद्देश आहे,” असे प्रतिपादन भाजपचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी केले.

 

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आमदार प्रमोदजी जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीत हे अभियान राबविण्यात आले.

प्रश्न ऐकून घेतलेच, अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना –

या अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोषजी साखरे यांनी सावंतवाडीत उपस्थित राहून नागरिक, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विविध शासकीय कामांबाबतची निवेदने स्वीकारली.

प्रलंबित प्रकरणे, शासकीय कार्यालयांमध्ये रखडलेली कामे, नागरिकांच्या अडचणी आणि विविध प्रशासकीय विषयांची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. ज्या प्रश्नांमध्ये तातडीच्या प्रशासकीय हस्तक्षेपाची आवश्यकता होती, त्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून नियमांच्या चौकटीत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्यामुळे नागरिकांना आपला प्रश्न योग्य प्रशासकीय पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

स्थानिक प्रश्नांपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा!

‘सेवा अभियान’ केवळ स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यापुरते मर्यादित राहणार नसून शासनस्तरावर निर्णय आवश्यक असलेल्या प्रकरणांचाही प्रभावी पाठपुरावा केला जाणार आहे.

अशा निवेदनांना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे कव्हरिंग लेटर जोडून संबंधित मंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच आवश्यक त्या शासकीय विभागांकडे प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रशासकीय तसेच शासनस्तरीय व्यासपीठ मिळणार आहे.

‘भाजपा निवडणुकीपुरती नाही; जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव मैदानात’

भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित संघटना नसून सामान्य माणसाच्या सुख-दुःखात आणि अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभी राहणारी संघटना आहे, हा संदेश ‘सेवा अभियानाच्या’ माध्यमातून ठळकपणे अधोरेखित होत आहे.

नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, त्या संबंधित शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचविणे आणि त्यांचा सातत्याने पाठपुरावा करणे, या कार्यपद्धतीमुळे ‘सेवा’ हीच संघटनेची कार्यसंस्कृती असल्याचे चित्र सावंतवाडीत पाहायला मिळाले.

“नागरिकांच्या प्रश्नांना केवळ आश्वासन देऊन थांबायचे नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करायचा. ‘सेवा अभियान’च्या माध्यमातून भाजपा संघटनेला प्रशासकीय बळ मिळत असून नागरिकांच्या प्रश्नांना गती देण्याची नवी कार्यसंस्कृती निर्माण होत आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

३७० निवेदनांतून जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत –

सावंतवाडीत पार पडलेल्या या अभियानात ३७० निवेदने प्राप्त झाली. नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आपल्या प्रलंबित प्रश्नांसाठी थेट मार्गदर्शन, प्रशासकीय संपर्क आणि पाठपुरावा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले.

यावेळी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगांवकर, जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब, पालकमंत्री नितेशजी राणे यांचे स्वीय सहाय्यक श्री. भोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जि.प. सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उपसभापती गौरव मुळीक, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रवी मडगांवकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष पप्पू परब, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, सावंतवाडी महिला मंडल अध्यक्ष सौ. मोहिनी मडगांवकर, प्रदेश महिला प्रतिनिधी सौ. रश्मी लुडबे, भाजपा युवामोर्चा आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे, सावंतवाडी युवामोर्चा मंडल अध्यक्ष हितेन नाईक, जि.प. सदस्य नितीन राऊळ, मायकल डिसोजा, सौ. अपर्णा सातोसकर, नगरसेवक आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, सौ. सुकन्या टोपले, सौ. दुलारी रांगणेकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सेवा अभियान’ ठरतेय जनतेच्या प्रश्नांसाठी आशेचा दुवा!

३७० निवेदने, शासकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि मंत्रालयापर्यंत पाठपुराव्याची हमी यामुळे सावंतवाडीतील ‘सेवा अभियान’ हे नागरिकांच्या प्रश्नांसाठी केवळ निवेदन स्वीकारण्याचे व्यासपीठ न ठरता प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील प्रभावी दुवा ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles