मोंड गावात आमदार नितेश राणे यांचा उबाठाला दणका, शाखाप्रमुख मोतीराम तावडे यांचा भाजपात पक्ष प्रवेश ; राष्ट्रवादी (श. प. ) चे कार्यकर्ते संदीप अनुभवणे व शशिकांत अनुभवणेही झाले भाजपवासी.

देवगड :  देवगड तालुक्यातील मोंड उबाठा शाखाप्रमुख मोतीराम सोनू तावडे, यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे कार्यकर्ते संदीप अनुभवणे आणि शशिकांत अनुभवणे यांचाही भाजपमध्ये प्रवेश घेतला.

आमदार नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकालात कोट्यावधींचा निधी आणून या भागाचा विकास केला आहे. या संदर्भात मोतीराम तावडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “आपल्या भागाचा विकास करायचा असेल, तर आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे आम्हाला आवडेल.”

यावेळी भाजपाचे पदाधिकारी बाळा खडपे, संदीप साटम, बंड्या नारकर, अमोल तेली, गणेश राणे, रवी पाळेकर आणि उत्तम बिरजे उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles