संजय पिळणकर
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर असलेला सातार्डा – न्हयबाग पुल धोकादायक बनला असून महाराष्ट्र राज्याच्या बाजूने रस्ता आणी पुलाच्या मध्ये घातलेल्या स्टीलच्या प्लेट्स तुटून दोन महिने झाले आहेत. तसेच याबाबत संबंधित यंत्रणेला याबाबत कल्पना देऊनही व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तब्बल एक महिना झाला तरी याबाबत प्रशासनाकडून काहीच उपाययोजना करण्यात न आल्याने येथील वाहनचालक, नागरिक नाराज असून एखादा बळी जाण्याची वाट प्रशासन बघत आहे काय? असा संतप्त सवाल केला जात आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
ADVT –



सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.



