Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

शाहबाज शरीफ याची खुर्ची धोक्यात ! ; पाकिस्तानमध्ये तख्तपालट होणार !

इस्लामाबाद : भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्याने पाकिस्तानला त्याची लायकी कळली. सर्वच आघाड्यावर पाकिस्तान चितपट दिसले. पाकिस्तानची जगात नाचक्की तर झालीच पण अंतर्गत यादवी, धूमश्चक्री वाढली आहे. एकीकडे बलुचिस्तान परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच स्वतंत्र सिंधची मागणी जोर धरू लागली आहे. पाकिस्तानी लष्कर आता युद्ध लढू इच्छित नाही. तर भारताकडून पराभव स्वीकारावा लागल्याने कट्टर धार्मिक नेते, मौलवी, मौलना, दहशतवाद्यांचे प्रमुख हे लष्कराच्या मागे उभे ठाकले आहे. त्यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफची खुर्ची धोक्यात आली आहे.

शरीफ सरकार धोक्यात –

पाकिस्तानातील शाहबाज शरीफ हा युद्ध करण्याच्या मानसिकतेत नव्हता. त्याला लष्करप्रमुख असीम मुनीर याने बळेच घोड्यावर बसवले होते. पण मुनीरची खर लायकी अवघ्या चार दिवसातच उघडी पडली. तर दुसरीकडे या चार दिवसात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर, कार्यालयांवर भारताने हल्ले करुन ते नष्ट केल्याने दहशतवादी नेते शरीफ विरोधात एकजूट झाले आहेत. तर कट्टर धार्मिक नेते, मौलवी, मौलना इतर जणांनी शरीफ विरोधात सूर आवळला आहे. खासदार शाहिद अहमद खट्टक यांनी तर पाकिस्तानच्या संसदेतच शहबाज शरीफला बुजदिल, कमकुवत आणि काय काय विशेषण लावली. पंतप्रधानांची इज्जत चव्हाट्यावर आणली.

तो एक निर्णय पाकला भोवला

पाकिस्तान सरकारने लष्कर प्रमुख असीम मुनीर याला फील्ड मार्शल केले. तर पाकिस्तानचा वायुदल प्रमुख जहीर अहमद बाबर याला निवृत्ती नंतर पण याच पदावर ठेवण्यात आले. हे दोन्ही निर्णय आता शाहबाज शरीफ याच्या गळ्याशी आले आहे. त्याला मोठा फटका बसला आहे. या दोन्ही हेकेखोरांनी त्याचे पानीपत केले आहे. इतकेच नाही तर ज्यांच्यामुळे मुनीर याला मोठे पद मिळाले, त्याच शरीफ यांना सत्तेबाहेर करण्याचा डाव तो रचत आहे.  तर आता पाकिस्तानमधील सरकारअंतर्गत अनेक घटक शरीफवर नाराज झाले आहे. भारताविरोधातील खोटा प्रचार पण उघड झाल्याने जनताही शरीफ सरकार आणि लष्करावर नाराज झाली आहे. त्यातच बलुचिस्तानमधून रोज सैनिक मारल्या जात असल्याचा सांगावा येत असल्याने जनता ही शरीफ सरकारवर नाराज आहे. त्यामुळे शरीफ जर सत्तेबाहेर फेकल्या गेले तर नवल वाटायला नको.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles