मुंबई : आयपीएल २०२५ च्या लीग टप्प्यातील उर्वरित ९ सामन्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच कोणतेही उर्वरित सामने पावसामुळे रद्द होऊ नये, यासाठी BCCI कडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे. सध्या आयपीएल २०२५ चा शेवटचा टप्पा सुरू आहे. यादरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात BCCI स्पर्धेसाठी काही नवीन नियम जारी केले आहेत. आयपीएल २०२५ या स्पर्धेच्या पुढील सामन्यांसाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवण्यात आला आहे. पावसाच्या शक्यतेमुळे हा बदल करण्यात आला आहे. १७ मे रोजी बेंगळुरू येथे होणारा आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर BCCI कडून हा नवा नियम जारी करण्यात आला आहे. आयपीएलचा कोणताही सामना पावसामुळे रद्द झाल्यास पूर्ण २० षटकांचा सामना व्हावा, यासाठी आयपीएलने अतिरिक्त १२० मिनिटे (२ तास) वेळ जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत हा अतिरिक्त वेळ फक्त प्लेऑफ सामन्यांसाठी ठेवण्यात येत होता.
ADVT –
https://satyarthmaharashtranews.com/12262/