सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील ‘तो ‘ रस्ता तात्काळ नीट करा! : ॲड. निता सावंत-कविटकर यांचा इशारा.

सावंतवाडी : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये रस्ता खोदाई करून तो व्यवस्थित बुजवला नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणीचं पाणी साचले असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दोन वाहने सोडा दोन माणसे देखील जाऊ शकत नाही. तसेच रस्ता खोदाई केलेल्या भागात उंचसखलपणा असल्यामुळे लोकाना रहदारी व वाहने जाण्या-येण्यास अडथळा निर्माण झालाय. दोन ते तीन दिवस काम अर्धवट सोडून बंद असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. सदर रस्ता लवकरात लवकर नीट करून देण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने जाब विचारू, असा इशारा नगरपालिका प्रशासनाला शिवसेना महिला जिल्हा प्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles