कोलंबो : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात टीम इंडियाने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 18 ओव्हरमध्ये 114 धावांवर गुंडाळलं. भारताने या विजयासह आपला सलग तिसरा विजय मिळवला. भारताने यासह पाकिस्तानला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं. तसेच भारताने यासह सुपर 8 फेरीत धडक दिली आहे.
टीम इंडियाचा आठवा विजय –
भारत-पाकिस्तान यांच्यातील हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील नववा सामना होता. टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील आपला विक्रम आणखी मजबूत केला. भारताचा हा पाकिस्तान विरुद्धचा आठवा विजय ठरला.



