आंबेवाडी ते निवी कालवा दुरुस्तीची अनेक कामे निकृष्ट, निधीचा अपव्यय. ; प्रशासनाविरोधात लवकरच आक्रमक, बळीराजा फाऊंडेशनचा इशारा.

शशिकांत मोरे.

रोहा: आठ ते दहा वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील कोलाड पाटबंधारेच्या उजवा आणि डावा तीर कालव्यावर करण्यात आलेल्या लायनिंग मास काँक्रिटीकरण कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाला होता.सत्ताधारी राजकीय दबावाखाली झालेल्या कामांत अनेक नेतेगण मालामाल झाले.अधिकारी,ठेकेदार मस्त चाललेय आमचे….असेच धक्कादायक वास्तवाची इतिहासात नोंद ठरली.आता त्याचीच पुनरावृत्ती कालवा दुरुस्तीच्या कामातील निकृष्ट लायनिंग काँक्रिटीकरण कामातून अधोरेखीत झाली आहे.

तब्बल दहाबारा वर्षे रखडलेल्या कालव्याची दुरुस्ती,पाणी आंदोलनाला रोह्यातील शेतकरी वर्गासाठी काम करणारी संस्था बळीराजा फांऊडेशनच्या नेतृत्वाखाली यश आले.दुरुस्तीसाठी आतापर्यंत करोडो रुपये खर्च पडले.दोन ते तीन वर्षात झालेल्या दुरुस्ती कामांतील अनेक एस्कॅप,सायपन मुख्यतः लायनिंग काँक्रीट कामे निकृष्ट करण्यात आली.सध्या हीच कामे बहुतेक एस्कॅप लिकेज् आहेत,कामांना ठेकेदारांनी चुना लावला असे भयान चित्र असतानाच पाले खुर्द गावानजीक केलेल्या लायनिंग काँक्रीट दुसऱ्याच वर्षी उखडत असल्याचे धक्कादायकपणे दिसून आले.लायनिंग कामांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात, कामे निकृष्ट झाल्याने वरिष्ठ अधिकारीच कारणीभूत आहेत.त्याच्यांच देखरेखीखाली निधीचा अपव्यय झाला असा आरोप आता चोहोबाजूने होत आहे.

दुरुस्ती कामे निकृष्ट,निधीचा अपव्यय झाल्याचे समोर आल्याने कामाची,बिले प्रकरणांची सखोल चौकशी करावी,संबंधीत ठेकेदारांना काळया यादीत टाकावे अशी मागणी करत प्रशासनाविरोधात लवकरच आक्रमक भूमिका घेऊ असा ईशारा बळीराजा फांऊडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोलाड पाटबंधारेची विविध कामे कशी, कोणामार्फत वाटप केली जातात हे पारंपारिक सर्वश्रुत आहे.त्यात करोडोंचा सिंचन घोटाळा घडूनही नेत्यांनी धाडस सोडलेले नाही.त्यांच्याच अधिपत्याखाली फंटर कालवा प्रकल्पाची कामे वाटप करतात, त्यातूनच कामांची पूर्तत: वाट लागते हे पुन्हा एकदा समोर आले.वाटप प्रक्रियेत अधिकार अशंत: कटपुतळी ठरतात.याचेच कालवा दुरुस्ती कामे निकृष्ट उदाहरणात स्पष्ट झाले. कालवा एस्कॅपची अनेक कामे निकृष्ट झाली आहेत.लिकेज् वाढले,तरी अधिकाऱ्यांच्या वागणुकीत बदल झालेला दिसत नाही.मागील वर्षात पाले खुर्द येथील कालव्याचे केलेले लायनिंग मास काँक्रीट पूर्णतः उखडत चालले आहे हे काम पाटील नावाच्या बाहेरील ठेकेदाराने केल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.इतर ठिकाणचे लायनिंग कामेही उखडण्याला सुरुवात झाली हे भयावत असताना पाटबंधारेचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा त्याच ठेकेदाराला कामे देतात,यामागे नेमके गौडबंगाल काय,कोणाचा दबाव आहे याची तुफान चर्चा सुरू झाली.

कालवा दुरुस्तीवर शासनाचे करोडो रुपये खर्ची पडले.त्यात अनेक कामे वर्षभरातच निकामी होण्याच्या मार्गावर आहेत.पाणी सोडण्याबाबत नियोजन नाही.अधिकाऱ्यांत समन्वय नाही हे वारंवार समोर येत असल्याने कालवा दुरुस्ती,पाण्यासाठी आंदोलन उभारणाऱ्या बळीराजा फांऊडेशनने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.शासनाच्या करोडो रुपये निधीचा अपव्यय झाला आहे‌.पूर्णतः कामांची चौकशी करावी,दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया सचिव दीपक भगत यांनी दिली.दरम्यान,अजूनही अनेक ठिकाणी कालवा मोठ्या प्रमाणात लिकेज् आहे. आंबेवाडी, संभे भागातील शेतकऱ्यांची नुकसान होते ही दुरुस्ती कामेही मुदतीत पूर्ण करावीत,पुढील हंगामात कालव्याचे पाणी पूर्ववत करावे,कामे दर्जेदार करावीत अशी आग्रही मागणीही बळीराजा फाऊंडेशनने केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles