माडखोल उपकेंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण. ; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.

सावंतवाडी: तालुक्यातील माडखोल येथील उपकेंद्रात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून  वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव समाजामध्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. अनवी राऊळ, सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO) गीतांजली चव्हाण, आरोग्य सेविका रुची सावंत, आशा सेविका समिक्षा पानोळकर, मयुरी तेली, श्रेया देसाई यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

वृक्षारोपणानंतर उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आले असून, निसर्गाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

“एक झाड लावूया, पृथ्वीला हिरवाईने नटवूया” हा संदेश देत प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा तसेच प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास हातभार लागला असून, निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण माडखोल उपकेंद्राने घालून दिले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles