‘त्यांना’ हा चित्रपट जास्त झोंबलाय, ‘देऊळ बंद -२’च्या टीकेवर प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर! ; कमाई १०० कोटींपासून किती दूर?

मुंबई : प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट २१ मे २०२६ रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जबरदस्त कमाई केली आहे. यामध्ये स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटात प्रवीण तरडेंनी पत्नीलाच संधी दिली, अशीही टीका होत असताना ते म्हणाले, "माझं करिअर, माझा संसार उभा राहावा यासाठी स्नेहलने तिच्या कारकिर्दीचा त्याग केला. त्यामुळे आज जर मी तिला एखाद्या चित्रपटात संधी दिली, तर त्याच चुकीचं काहीच नाही. ज्याच्याकडे पात्रता नाही, त्याला संधी देणं म्हणजे नेपोटिझ्म."

बॉक्स ऑफिस ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी 1117 शोजमधून 2.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 66.56 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. रविवारीही चांगली कमाई झाली तर हा चित्रपट 70 कोटी रुपयांचा टप्पा पार करू शकेल. तर भारतातील नेट कमाई 56.60 कोटी रुपये इतकी आहे. ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने फक्त दोन आठवड्यांत 60.50 कोटी रुपये कमावले आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर इतर बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांची टक्कर असतानाही ‘देऊळ बंद 2’साठी वीकेंडला थिएटर्समध्ये गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू का होईना, हा चित्रपट कमाईच्या 100 कोटींच्या टप्प्याकडे पोहोचू शकतो.

'देऊळ बंद 2' या चित्रपटाने फक्त दोन आठवड्यांत 60.50 कोटी रुपये कमावले आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर इतर बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांची टक्कर असतानाही 'देऊळ बंद 2'साठी वीकेंडला थिएटर्समध्ये गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू का होईना, हा चित्रपट कमाईच्या 100 कोटींच्या टप्प्याकडे पोहोचू शकतो.

काहींनी या चित्रपटाला ट्रोलसुद्धा केलं आहे. या ट्रोलिंगवर आता प्रवीण तरडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जे देव मानत नाहीत त्यांना हा चित्रपट जास्त झोंबलाय. माझ्या देवाचा उदो-उदो मीच करणार. त्यामुळे माझ्या देवांचा उदो-उदो केला आणि कोणाला त्रास झाला याबद्दल मला काही देणं-घेणं नाही. उलट मी जास्त आनंदी झालो, म्हणजे तिर निशाने पे लगा है’, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.

बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 17 व्या दिवशी 1117 शोजमधून 2.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 66.56 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. रविवारीही चांगली कमाई झाली तर हा चित्रपट 70 कोटी रुपयांचा टप्पा पार करू शकेल. तर भारतातील नेट कमाई 56.60 कोटी रुपये इतकी आहे.

काहींनी या चित्रपटाला ट्रोलसुद्धा केलं आहे. या ट्रोलिंगवर आता प्रवीण तरडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जे देव मानत नाहीत त्यांना हा चित्रपट जास्त झोंबलाय. माझ्या देवाचा उदो-उदो मीच करणार. त्यामुळे माझ्या देवांचा उदो-उदो केला आणि कोणाला त्रास झाला याबद्दल मला काही देणं-घेणं नाही. उलट मी जास्त आनंदी झालो, म्हणजे तिर निशाने पे लगा है’, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles