सावंतवाडी: येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा तबला परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता सहावी मधील कु. प्रजय सावंत याने विशेष प्रावीण्य प्राप्त करून संस्थेचा गौरव वाढविला. तसेच कु. रुद्र देसाई याने प्रथम श्रेणी मिळवत उत्कृष्ट कामगिरी दर्शवली. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे तबला शिक्षक श्री. प्रमोद मुंडये यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संचालक ॲड. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौं. प्राची साळगावकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले व परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
तबल्याच्या तालावर स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे दैदिप्यमान यश! ; गांधर्व परीक्षेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]



