अरे बापरे ‘हे’ तर लई भयंकर!, चक्क शाळेत विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार! ; शिक्षकासह ७ जणांचा मृत्यू.

बँकॉक : थायलंडमधून जगाला हादरावणारं वृत्त हाती आलं आहे. थायलंडमध्ये शाळेत शुक्रवारी एका विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात एक शिक्षकासहा सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण थायलंडमध्ये खळबळ उडाली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याने शाळेच्या परिसरात येऊन अचानक गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडली. रॉयटर्सच्या माहितीनुसार, नोथांबुरी प्रांतातील पोलीस कमांडर लेफ्टिनंट कर्नल डेचरापी कोंगाडी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. संशयित हल्लेखोराने आत्महत्या देखील केली आहे. जखमींमध्ये एक शिक्षक आणि तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही संपूर्ण घटेचा थरार बँकॉकच्या नोंथाबुरी प्रांतातील बँग क्रुआई जिल्ह्यात झालं. गोळीबार करणारा हा विद्यार्थीच असल्याचे समोर आलं आहे.

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये गोळीबाराच्या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. या घटनेत जवळपास 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, बँकॉकमधील देबसिरिन नोनथाबुरी नावाची ही शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्याने गोळीबार करून दहशत माजवली आहे. या गोळीबारानंतर घटनास्थळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. एका फोटोत शिक्षक स्ट्रेचरवर दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला बचाव पथखाचे जवान दिसत आहे. थायलँडमधील पोलीस आणि बचाव पथकाने विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचारी वर्गांना सुरक्षित ठिकाणी रेस्क्यू केलं आहे. त्यानंतरही काही विद्यार्थी शाळेत अडकले आहेत. या विद्यार्थ्यांचा ओरडण्याचा आवाज येत आहे.

थायलंडचे शिक्षणमंत्री प्रसर्ट यांनी सांगितलं की, या गोळीबारात 20 जणांसहित काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलं आहे. हल्लेखोर हा शाळेतील विद्यार्थी होता. या खासगी शाळेत 3000 विद्यार्थी शिक्षण घेतात. या हल्लेखोराने काही लोकांचा जीव घेतल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आयुष्य संपवलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles