सावंतवाडी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय पर्वानिमित्त सावंतवाडी शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. ‘गोविंदा… गोविंदा!’च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले असतानाच भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट देत श्रीकृष्णाचे मनोभावे दर्शन घेतले.

जन्माष्टमीच्या निमित्ताने विशाल परब यांनी सावंतवाडी येथील पुरातन मुरलीधर मंदिरात जाऊन श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. कृष्णनामाचा गजर, फुलांची सजावट आणि भक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसराला जणू गोकुळनगरीचे रूप प्राप्त झाले होते.
यानंतर त्यांनी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, क्रीडा सभापती आनंद नेवगी, ओबीसी मंडल अध्यक्ष धिरेंद्र म्हापसेकर तसेच नगरपालिका आरोग्य अधिकारी दीपक म्हापसेकर यांच्या निवासस्थानी भेट देत श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
जन्माष्टमीच्या या पवित्र सोहळ्यात भक्तीभावाने सहभागी होत विशालजी परब यांनी सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या भेटीमुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी केतन आजगांवकर, श्रीकांत राजाध्यक्ष यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर, गोविंदाच्या जयघोषाचा निनाद आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण… अशा मंगलमय वातावरणात सावंतवाडी शहरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



