खेळाकडे करिअर म्हणून बघा, मैदान जिंकता तसे मनेही जिंका! : भाजपा युवा नेते विशाल परब यांचा मौलिक सल्ला!

निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ क्रिकेटचा महासंग्राम रंगला!

सावंतवाडी : खेळाकडे करिअर म्हणून बघा, मैदान जिंकता तसे मनेही जिंका!, आपल्या कोकणातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. हीच गुणवत्ता एक दिवस आपल्याला यशाकडे नेणार असा मला ठाम विश्वास आहे, असे प्रतिपादनभाजपा युवा नेते विशाल परब यांनी केलं.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य युवा नेते विशालजी परब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच निरवडे येथील प्रगतशील शेतकरी अमय पै यांच्या उपस्थितीत युवा निरवडे आणि बांदिवडेकरवाडी आयोजित अंतिम सामन्यात के. पी. गौरव संघ बांदा व साईश इलेव्हन कारिवडे संघात जबरदस्त थरार अनुभवायला मिळाला! खेळाडूंचा प्रचंड उत्साह आणि प्रेक्षकांची गर्दीमुळे मैदान हाऊसफुल झाले होते.

युवा निरवडे व बांदिवडेकर वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” क्रिकेट स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. या सोहळ्याला युवा नेते आणि महाराष्ट्र राज्याचे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व श्री. विशालजी परब यांनी प्रमुख उपस्थिती लावून खेळाडूंचा आणि आयोजकांचा उत्साह वाढवला.

यावेळी व्यासपीठावर आणि मैदानावर अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यात उपसरपंच अर्जुन पेडणेकर, मळगावचे सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, निरवडेचे माजी सरपंच प्रमोद गावडे, आणि निरवडेचे पोलिस पाटील अजित वैज,केतन अजगावकर, धीरेंद्र म्हापसेकर यांचा समावेश होता.

या यशस्वी आयोजनासाठी अमय पै, यांच्यासह बांदिवडेकरवाडीचे प्रमुख आधारस्तंभ भरत बांदिवडेकर, योगेश्वर बांदिवडेकर, सखाराम बांदिवडेकर, भुषण बांदिवडेकर, कृष्णा बांदिवडेकर, मोहन बांदिवडेकर आणि राजन बांदिवडेकर यांच्यासह तमाम युवा निरवडे व बांदिवडेकरवाडीच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
अंतिम सामना के. पी. गौरव बांदा व धाव्यांश स्पोर्टस साईश इलेव्हन कारिवडे यांच्यात होऊन बांदा संघ विजेता ठरला तर कारिवडे संघ उपविजेता ठरला. तर लतीक ब्लेसीयल नेमळे संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर यशोधा वारियर्स कलंबीस्त संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला.
के. पी. गौरव बांदा संघाचे संघमालक गौरव नाटेकर व संपूर्ण संघाने युवा भाजपा नेते विशालजी परब यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षिस एक लाख व आकर्षक चषक स्विकारला. तर साईश इलेव्हन कारिवडे संघाचे संघमालक हादेव नाईक व संपूर्ण संघाने द्वितीय क्रमांकाचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक विशालजी परब यांच्या हस्ते स्विकारला.तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व चषक लतीक ब्लेसीयल नेमळे संघाचे संघमालक विपूल नेमळेकर यांनी विशालजी परब यांच्या हस्ते स्विकारले तर चतुर्थ क्रमांकारे रोख पारितोषिक व चषक यशोधा वारियर्स कलंबीस्त संघाचे संघमालक प्रशांत मेस्त्री यांनी स्विकारले.

या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व युवा एकवटले असून, ग्रामीण भागातील क्रिडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles