कुडाळ : पावशी येथील भंगसाळ नदीवरील संरक्षक भिंतीचे काम मागील काही दिवसांपासून ठप्प आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने हे काम पूर्ण न झाल्यास येथील जमीन खचून दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पावशी ग्रामपंचायत माजी सदस्य प्रसाद मुरलीधर शेलटे यांनी याबाबत अधीक्षक अभियंता पतन विभाग (सार्वजनिक बांधकाम) कुडाळ यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रसाद शेलटे, ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बाळा कोरगावकर, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, बबन बोभाटे आदी उपस्थित होते.

पुढील चार दिवसात भंगसाळ नदीवरीलसंरक्षक भिंतीचे काम ठेकेदाराने पूर्ण न केल्यास पावशी ग्रामस्थांना घेऊन पतन विभागाच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.



