सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे दोन दिवशीय भव्य महाअधिवेशन २३ मे रोजी आंबोली येथे होणार ! ; सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांची माहिती.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे दोन दिवशीय भव्य महाअधिवेशन आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २३ मे रोजी या संमेलनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पतसंस्थांचे असे भव्य महाअधिवेशन संपन्न होत आहे. या अधिवेशनामध्ये पतसंस्था समोरील आव्हाने, संगणकीय तंत्रज्ञानात नव्यानेच कार्यरत होणार ए आय तंत्रज्ञान व एकंदरीतच या चळवळीमध्ये उभी असणारी विविध आव्हाने यावर मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. हे अधिवेशन विविध कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या नागरी पतसंस्था, ग्रामीण विगर शेती पतसंस्था व पगारदार पतसंस्था अशा विविध १५० पतसंस्था कार्यरत आहेत. ज्या संस्थानी ५ कोटी पेक्षा जास्त खेळते भागभांडवल उभे केलेले आहे, अशा सर्व सहकारी पतसंस्थाना या अधिवेशनामध्ये गौरव प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून आमदार दीपक केसरकर, आमदार डॉ. निलेश राणे उपस्थित राहणार असून या मान्यवरांच्या हस्ते संस्थांना गौरव प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

सहकारी पतसंस्थांची ही चळवळ अधिक वृध्दीगंत व्हावी व सर्वसामान्यांना ती आधारभुत ठरावी व त्यांनी अधिक जोमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला कार्य विस्तार करावा, या उद्देशाने पतसंस्था फेडरेशनच्यावतीने त्यांना गौरविण्यात येणार आहे. या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सुनील राऊळ यांनी केली आहे.

या महाअधिवेशनामध्ये प्रामुख्याने नव्याने लागू झालेला आदर्श उपविधी या विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. पतसंस्थाना कर्ज वितरण व कर्ज वसुलीमध्ये ज्या अनेक समस्या उद्भवतात, यावर पुणे येथील आर. बी. यादव हे मार्गदर्शन करणार आहेत. सायबर क्राईमचा वाढता धोका याविषयी पुंडलिक सातोसे हे मार्गदर्शन करणार आहेत.

भविष्यामध्ये पतसंस्थासमोरील आव्हाने व त्यावर उपाययोजना याबाबत महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन हे मार्गदर्शन करतील. ताणतणाव व्यवस्थापन यावर पुणे येथील योगा तज्ञ व योग अभ्यासक अशोक देशमुख हेही मार्गदर्श न करणार आहेत.

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलालजी सिंगी (छत्रपती संभाजी नगर) संचालक सुदर्शनराव भालेराव, (बुलढाणा), कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष गिरिश तुळपुले (अलिबाग) असे सहकार चळवळीतील अग्रेसर नेतृत्व या अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत व मार्गदर्शन करणार आहेत.

आंबोली येथे दोन दिवशीय अधिवेशन चालणार असुन, या अधिवेशनाकडे एक अभ्यासपुर्ण अधिवेशन म्हणून पाहिले जात आहे. यातूनच शासन स्थरावर ज्या काही समस्या उद्भवतात अशांचा सांगोपांग विचार करून त्या सोडवण्यासाठी हे फेडरेशन कार्यरत राहणार असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष श्री.

सुनिल राऊळ यांनी दिली. हे अधिवेशन घेण्याचे धाडसी पाऊल हे पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाने घेतले, ही स्तुत्य बाब आहे. फेडरेशनचे कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगांवकर, उपाध्यक्ष सुनील नाईक, संचालक बाबुराव कविटकर, अॅड. समीर वंजारी,  विष्णु पराडकर, सुभाष चौधरी, तज्ज्ञ संचालक रमेश बोंद्रे व सचिव महेश्वर कुंभार हे कार्यरत आहेत.

या अधिवेशनात जिल्हयातील पतसंस्थांनी मोठ्या संस्थेने सहभागी व्हावे, असे आवाहन सुनील राऊळ यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles