सावंतवाडी : माजगाव हरसावंतवाडा येथील सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजगावचे रहिवासी, माजी जिल्हा बँक संचालक कै. विकासभाई सावंत यांचे ज्येष्ठ बंधू वसंत गजानन तथा अण्णा सावंत (वय ६८) यांचे आज, शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंत कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे.
अण्णा सावंत यांच्या निधनाची बातमी समजताच माजगाव हरसावंतवाडा परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांचे स्थान महत्त्वाचे होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.
जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, पुतण्या असा परिवार आहे.
अण्णा सावंत यांच्या पार्थिवावर आज रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांना सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!



