– संजय पिळणकर.
वेंगुर्ला : छोट्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, पोवाडे ठरले लक्षवेध
वेंगुर्ला : दी १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.त्याचप्रमाणे जि प पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं १ या प्रशालेत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कु.तनिष्का व तनिषा वृंदन केळूसकर या विद्यार्थिनींनी (जुळ्या बहिणी) पोवाडा सादर केला.
तसेच माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात कु.समर्थ अभिषेक वेंगुर्लेकर, कु.आर्या उदय राऊत,कु.स्वरा हर्षद कांदे,कु.वाणी बिजितकर, कु.तनिष्का गुंजन केळुस्कर, कु.तनिषा गुंजन केळुस्कर, कु.सान्वी स्वप्नील राजपूत,कु.संतोष बागायतकर,कु.दिव्या भिकाजीं राऊत,कु.भार्गवी बापू वेंगुर्लेकर, कु.अर्णव समीर धुरी यांनी उत्कृष्ठ वेशभूषा साकारले.
तसेच बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर,व्यवस्थापन समिती सदस्य संजय पिळणकर, सहाय्यक शिक्षिका सौ.लीना नाईक, सौ.रिमा मालवणकर,अनुश्री कुशे, सौ.प्रगती आव्हाड,मिलिंद सरोदे, पालक गुंजन केळूसकर,सौ.दीपिका बिजितकर,सौ.रजपूत आदी उपस्थित होते.