संत समाज हळदोणाच्या अध्यक्षपदी शिवानंद नाईक. ; सन २०२६ ते २०२९ नव्या कार्यकारिणीची घोषणा.

हळदोणा (गोवा) : धर्मभूषण पद्मश्री विभूषित परमपूजनीय ब्रह्मेशानंदाचार्य सद्गुरूमाऊलींच्या कृपा-आशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज हळदोणा आयोजित साप्ताहिक संत समागम रविवारी (दि. १२) रात्री श्री नितीन नरेश नाईक (वळावली) यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे यजमान श्री. व सौ. नितीशा नितीन नाईक होते. धार्मिक विधी श्री. रोहिदास नाईक यांनी पार पाडले. धर्मप्रचारक म्हणून श्री. सविदास हरिचंद्र नाईक यांनी सेवा केली तर उद्घता सेवा कु. दिविका नार्वेकर यांनी केली.

 

यावेळी केंद्रीय संत समाज संघटनेचे खजिनदार श्री. गजेश मांद्रेकर, बार्देश तालुका प्रमुख श्री. आकाश बाणावलीकर, श्री. गुरुदास नाईक (श्री गोपाळकृष्ण मंदिर सदस्य) तसेच सौ. करिष्मा सटेलकर (जगत जननी सदस्या) यांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ. वर्षा अनिल नार्वेकर, सौ. सुजया सविदास नाईक, श्री. शिवानंद नरेश नाईक, श्री. अनिल नार्वेकर, श्री. सविदास हरिचंद्र नाईक श्री माधव खानोलकर आणि कु. देविका नार्वेकर यांनी सद्गुरू सेवेचे अनुभव कथन केले. श्री. गजेश मांद्रेकर यांनी सद्गुरू सेवा, ध्यान व नामजपाचे महत्त्व स्पष्ट केले, तर श्री. आकाश बाणावलीकर यांनी सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.
सविदास नाईक यांनी माजी समितीचे पदाधिकारी व सेवा कार्य अनुभव सर्वांसमोर कथन केले.

याप्रसंगी संत समाज हळदोणा यांच्या २०२६–२०२९ या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी श्री. शिवानंद नरेश नाईक, उपाध्यक्षपदी सौ. वर्षा अनिल नार्वेकर, सचिवपदी श्री. सविदास हरिचंद्र नाईक, सहसचिवपदी सौ. नितीशा नितीन नाईक, खजिनदारपदी सौ. शिवानी शरद पाळणी, सहखजिनदारपदी श्री. भगवान रमेश पाळणी, तर सदस्यपदी सौ. संगीता गंगाराम नेमळेकर, श्री. सागर सोनू केरकर आणि श्री. विश्वनाथ नारोजी यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर उपस्थितांनी सद्गुरूंच्या नामघोषात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने गुरुबंधू-भगिनी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles