Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

मालवणचो कट्टो प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र दिन, कामगार दिन व सिंधुदुर्ग स्थापना दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न !

थॅलेसेमिया निर्मूलनासाठी सिंधुदुर्ग रेड बटालियन, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने भरवले शिबीर.

मुंबई : थॅलेसेमिया निर्मूलनासाठी मालवणचो कट्टो प्रतिष्ठान(रजि.) मुंबई, सिंधुदुर्ग रेड बटालियन,
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने समर्पण रक्तपेढी घाटकोपर (ईस्ट) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. असह्य उन्हाळा असूनही थॅलेसेमिया रुग्णाच्या रक्तदानाच्या गरजा पुरवण्यासाठी या चारही संस्थांचे शूर रक्तदाते या उपक्रमामध्ये सहभागी होऊन ज्याला सर्वश्रेष्ठ दान म्हटले असे रक्तदान केले आणि कित्येक थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांना आधार दिला. रक्तदानाची चळवळ उभी करणारे सुरेश प्रभाकर रेवणकर सरांनी उपस्थित राहून रक्तदात्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सुरेश रेवणकर यांनी तब्बल ११० वेळा रक्तदान केले असून ५२ वेळा पांढऱ्या पेशी दान केल्या आहेत. रक्तदान आणि पांढऱ्या पेशी दान करण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. हिशोबही न ठेवता अनेकवेळा प्लेटलेट दान करणारे समीर सावंत सर यांनीही उपस्थित राहून प्लेटलेट डोनेशन केले.
मालवणचो कट्टो प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य म्हणजे रक्ताचा तुटवडा बघता अनेकदा रक्तदान शिबिरे पार पडली असताना देखील बऱ्याच नवीन (पहिल्यांदा रक्तदाते) व काहीच महिन्यांपूर्वी रक्तदान केलेल्या जुन्या रक्तदात्यांनी सुद्धा पुन्हा रक्तदान केले. समाजातील विशिष्ठ अशा घटकासाठी सदैव मदतीस तयार असणाऱ्या या रक्तदात्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. यावेळी चारही ग्रुपचे रक्तदाते, उपस्थित सदस्य, व्यवस्थापक सर्वांनी आपापली जबाबदारी चोख सांभाळली. विशेषतः वैभव गावडे व कृष्णा कदम यांनी नाष्ट्याची उत्तम सोय केली. विनायक पाटील व गुरुदास घाडी यांनी या उपक्रमाचे क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात अचूक टिपली. सचिन जोईल यांनी लॅपटॉप वर सर्व रक्तदात्यांची व्यवस्थित नोंदणी केली.

‘या’ सदस्यांनी बजावले रक्तदानाचे कर्तव्य !
सचिन चाफळे, विजय पांचाळ, निलेश नागोटकर, जयप्रकाश पुजारी, प्रदीप चव्हाण, विलास लांडगे, प्रकाश भोसले, अजय सकपाळ, ज्योती गुरव, सुमित पोयरेकर, भूषण पोंडे, आनंद साबळे, संतोष आवारे, समीर जाधव, अभिषेक राऊळ, अजित सूर्यवंशी, ओमकार म्हात्रे, विशाल पेडणेकर, नरेश हरसुले, रितिक सावंत, आरती घाडी, मितेश परब, ओमकार परब…
याव्यतिरिक्त राहुल गाडे, जान्हवी नागोटकर, स्नेहा मालप, ओंकार जोशी हे देखील इच्छुक होते परंतु, काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना रक्तदान करता आले नाही. या रक्तदान शिबिरासाठी झटणारे चारही समूहातील सर्व रक्तदाते, उपस्थित सर्व सदस्य, मान्यवर, इतर सहकारी समूह सर्वांचे मालवणचो प्रतिष्ठानचे सुधीर कांदळकर यांनी आभार मानले.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles